जरांगे-पाटील उपाेषणावर ठाम ; राज्‍यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत

Photo of author

By Sandhya

जरांगे-पाटील उपाेषणावर ठाम

मराठा आरक्षण प्रश्‍नी गेले दहा दिवस बेमुदत उपोषण सुरु ठेवलेले मनाेज जरांगे-पाटील हे आज पुन्हा एकदा आपल्‍या उपाेषणावर ठाम राहिले. आज पुन्‍हा सरकारच्‍या  शिष्टमंडळातर्फे अर्जुन खोतकर सुधारित जीआर प्रत देण्यासाठी आंदाेलनस्‍थळी आले; पण राज्य सरकारचा सुधारित जीआर हा समिती नियुक्‍तीचा आहे.

राज्‍यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल, असे जरांगे-पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. यावेळी पुढील दाेन दिवसात सरकार बराेबर चर्चा  हाेईल, असेही ते म्‍हणाले.

मराठा आरक्षण प्रश्‍नी जीआरची सुधारित प्रत घेऊन शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगे-पाटील यांच्या भेटीस गेले होते. जरांगे-पाटील यांनी आज सकाळी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी केलेली होती.

त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास शिष्ट मंडळाकडून अर्जुन खोतकर या सुधारित जीआरची प्रत पाटील यांना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखला देणार याबाबत घोषणा केली होती.

त्यानंतर जरांगे-पाटील यांनी हवे ते पुरावे देतो, असे सांगत मराठा आरक्षणासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा आज हवी ती सुधारणा करुन जीआर प्रसिद्ध करावा, अशी मागणी पाटील यांनी केली होती.

गुरुवारी दुपारी सरकारच्या शिष्ट मंडळाकडून सुधारित जीआरची प्रत घेऊन अर्जुन खोतकर आंदोलन स्थळी आले होते. मात्र राज्‍यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल, असे जरांगे-पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. यावेळी पुढील दाेन दिवसात सरकार बराेबर चर्चा  हाेईल, असेही ते म्‍हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page