प्रकाश आंबेडकर : इंडिया आघाडी भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकली

Photo of author

By Sandhya

प्रकाश आंबेडकर

भारत आणि इंडिया हे एकमेकांच्या विरोधात नाही. मी इंडियाचा भाग आहे की नाही, येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार आहे. इंडिया आघाडी सध्या भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकली आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

देशात इंडिया आघाडीच्या नावावरून चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, की इंडिया दॅट इज भारत हे नाव असल्याने आपण इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे वापरू शकतो.

मात्र, घटनेच्या प्रस्तावनामध्ये इंडिया हेच नाव आहे. त्यामुळे ते नाव वगळता येणार नाही. कारण संविधानाची प्रस्तावना बदलता येत नाही. हे घटना बदलण्यासारखे होईल, असे ते म्हणाले.

इंडिया आघाडीतील नेते बुद्धू आहेत. घटना समितीत इंडिया की भारत असा वाद झाल्यानंतर हिंदी की इंग्रजी या मुद्द्यावर मतदान झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजीच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला होता, अशी पार्श्वभूमीही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितली.

ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करणार्‍यांनी स्वतः सत्तेत असताना का नाही आरक्षण दिले?, असा सवाल त्यांनी मराठा आरक्षणाबाबत उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांनी आता स्वतः तोडगा काढावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment