जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर : आयसीसी कसोटी गोलंदाज क्रमवारीत नवा विक्रम

Photo of author

By Sandhya


जसप्रीत बुमराहबाबत आता एक गुड न्यूज आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आता बुमराहबाबत एक मोठी बातमी आली आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही गोष्ट सुखावणारी असणार आहे.
सिडनी कसोटीत बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर बुमराहला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. बुमराच्या पाठीमध्ये उसण भरली होती. त्यामुळे त्याला मैदानात खेळणे शक्य नव्हते. त्यामुळे भारतीय संघाला गरज असतानाही बुमराहला खेळता आले नव्हते आणि भारताला सामना गमवावा लागला होता. त्यानंतर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला होता. पण त्यापूर्वी आता बुमराहसाठी एक गुड न्यूज आली आहे.
बुमराह हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मालिकावीर ठरला होता. कारण बुमराहने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे भारताने सामन्यासह मालिका गमावली असली तरी बुमराहला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता. आता तर आयसीसीनेही बुमराहच्या या कामगिरीची दखल घेतली आहे. कारण आता आयसीसीच्या क्रमवारीत बुमराहने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कारण आतापर्यंतच्या कारकिर्दीत कधीही जेवढे पॉइंट्स बुमराला मिळाले नव्हते ते आता मिळाले आहेत. बुमराह कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण यावेळी त्याच्या खात्यात कारकिर्दीतील सर्वाधिक म्हणजेच ९०८ गुण आहेत. बुमराहच्या आसपासही यावेळी कोणीच नसल्याचे समोर आले आहे.
जसप्रीत बुमराह या गोलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. कमिन्सच्या खात्यात ८४१ गुण आहेत, त्यामुळे बुमराह आणि त्याच्यामध्ये यावेळी मोठा फरक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पॅट कमिन्सला अव्वल स्थानावर सध्या तरी पोहोचता येणार नाही. त्यामुळे आता बुमराह हाच बरेच दिवस अव्वल स्थानावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. पण इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी २० मालिकेत मात्र त्याला खेळवणार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page