संतोष देशमुख हत्या प्रकरण : आ. संदीप क्षीरसागर आक्रमक, पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप

Photo of author

By Sandhya


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंबंधित पोलिस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. कराडने पुण्यात सीआयडी मुख्यालयात आत्मसमर्पण केले होते. याप्रकरणी अनेक गंभीर आरोप कराडवर केले जात आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्येसंबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाल्मिक कराड याची सध्या चाैकशी सुरू असून तो पोलिस कोठडीत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले जात आहेत. पुण्यात वाल्मिक कराडने सीआयडीच्या मुख्यालयात जाऊन आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला केजच्या न्यायायलात दाखल हजर करण्यात आले आणि पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.
आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडला पोलिस स्टेशनमध्ये व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. क्षीरसागर हे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. संदीप क्षीरसागर हे म्हणाले की, मुळात म्हणजे हे प्रकरण ज्यावेळी वाल्मिक कराडवर येते, त्यावेळी हे प्रकरण कुठेतरी थांबल्यासारखे वाटते. बाकी अटक वगैरे झालीये.
बाकीचे या प्रकरणातील लोक आहेत, ते सुपारी घेऊन काम करणारी लोक आहेत. मात्र, याचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड आहे. आम्हाला जी काही माहिती मिळतंय, ती आम्ही पोलिस प्रशासनाकडे देत आहोत. मुळात म्हणजे सीडीआर काढायला वेळ किती लागतो?. वाल्मिक कराडच आहे की, अजून कोण आहे हे देखील कळेल. बारा तास घटनेची नोंद व्हायला उशीर झाला, याचे कारण काय आणि कोण होते.
12 तासांमध्ये एसपी असतील. पोलिस स्टेशनमधील अधिकारी असतील, या काळामध्ये त्यांना कोणी कोणी फोन केला, हे सर्व काढले पाहिजे. कोणताही गुन्हेगारी असो, त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या हातातील दोरे, गळ्यातील दोरे काढली जातात. मात्र, आताही तुम्ही वाल्मिक कराडला बघितले तर त्याच्या हातातील दोरे हे सर्व तशीच आहेत. वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकताच भेट घेतली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page