जयंंत पाटील : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी निवडून येण्याची क्षमता हाच निकष

Photo of author

By Sandhya

जयंंत पाटील

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा याेग्य पद्धतीने सुरू असून जागा वाटप करताना निवडून येण्याची क्षमता हाच निकष पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महायुतीच्या घटक पक्ष हे नव्याने एकत्र आले असून त्यांना ओळख़ी वाढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हानिहाय मेळावा घेण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडी ही २०१९ पासून एकत्र आहे. महाविकास आघाडीत नव्याने भेट घेण्याची गरज नाही, असे पाटील यांनी नमूद केले आहे.

सर्वाेच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रताेद सुनील प्रभू हे असल्याचे नमूद केले हाेते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे भरत गाेगावले यांना प्रताेद गृहीत धरून निकाल दिला आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.

शिवसेना ही खरी काेणाची आहे हे जनतेला माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या निकालाआधी झालेल्या भेटीमुळे जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे, असे मतही पाटील यांनी नमूद केले आहे.

लाेकसभेच्या निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची दिल्ली येथे बैठक झाली आहे. या बैठकीला जितेंद्र आव्हाड हे गेले हाेते. चर्चा याेग्य पद्धतीने सुरू असून आणख़ी एकादी बैठक होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जागा वाटप होताच तत्काळ उमेदवारांची यादी जहीर केली जाणार आहे.

पुणे लाेकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसने मागितली नाही, परंतु काॅंग्रेसकडे निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार आहे की नाही, याची विचारणा करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत एवढ्या एवढ्या जागा निवडून येथील असा दावा करून राज्यातील जनतेला कोणी गृहीत धरणे योग्य नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment