जयंत पाटील : सरकार पिक विमा कंपन्यांच्या दावणीला

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जयंत पाटील यांच्यासह आमदार एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला परिषद अध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार सतीश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत. पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारने या कंपन्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी.”

पाटील पुढे म्हणाले, “गेल्या वर्षी कापसाचा भाव 12 हजार रुपये होता. यावर्षी तो साडेसहा ते साडेसात हजार रुपये आहे. उर्वरित पाच हजार रुपये सरकारने अनुदान म्हणून देण्यात येत जाहीर करावे. कांद्याच्या शेतकऱ्यांचीही अवस्था बिकट आहे. शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न खर्च सुद्धा निघालेला नाहीये.

सरकारने शेतकऱ्यांना दर मिळवून देण्यासाठी चढा दराने कापूस खरेदी चालू ठेवावी आणि कापूस निर्यात करावी.” पाटील यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, “हे सरकार विमा कंपनीच्या धावण्याला बांधले गेले आहे.

सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. जर सीसीआय केंद्र सुरू झाली असती तर आज भाव वाढले असते. मात्र ती सरकारने संधी गमावली आहे.”

पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न, त्यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न हे मोठे प्रश्न असताना त्यातून मार्ग काढण्याचे महत्त्वाचे आहे. मात्र हे सरकार अपयशी ठरलेले आहे. सरकारचा प्रशासनावर अंकुश नाही.

मंत्री वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांवर अंकुश नाही. त्यांच्यामध्ये एक संगता नाही. त्यामुळे सरकारचे निर्णय जनतेला दिलासा देणारे नाहीत.”

पाटील यांनी अखेरीस म्हटले, “आमच्या आघाडीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात आली होती. म्हणून आजही महाविकास आघाडीची लोकप्रियता राज्यात टिकून आहे.” 

Leave a Comment