जितेंद्र आव्हाड : दोन वर्षांपूर्वी असाच मोठा स्फोट, त्या घटनेनंतर MIDCने किती कंपन्यांचे फायर ऑडिट केले?

Photo of author

By Sandhya

जितेंद्र आव्हाड

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीमधील फेज २ मध्ये असणाऱ्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज (गुरुवारी) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास बॉलरलचा स्फोट झाला. या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरल्याचे दिसून आले.

घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग इतरत्र पसरत असल्याची माहिती आहे. तर या घटनेत ५ ते ६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हडांनी फायर ऑडिट होत नसल्याचा आरोप केला आहे.

फायर ऑडिट होत नाहीच- आव्हाड जी काळजी घ्यायची असते ती कंपनी कधीच घेत नाही. फायर ऑडिट नावाची गोष्ट कधीच महाराष्ट्र सरकारचे जे विभाग आहे ते किंवा एमआयडीसी कधीच करत नाही. त्यामुळे ऐनवेळी जो सपोर्ट हवा तो कधी मिळत नाही. आगी लागतात, त्या भडकतात. अशा घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो.

गोन दिवस बातम्या चालतात त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वेगळी बातमी असेल. त्यानंतर मृतांच्या कुटुंबियाला ५ ते १० लाख रूपये मिळतील, त्यानंतर पुढची चर्चा बंद. दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत मोठी आग लागली होती. त्या आगीची झळ घराघरातपर्यंत पोहचली होती.

दोन किलोमीटरपर्यंत ती आग पसरली होती. त्यानंतर किती कंपन्यांनी फायर ऑडिट केला. त्याचा पेपर एमआयडीसीने काढावा. कोणत्या केमीकल कंपनीचे ऑडिट केले आहे. व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत मोठी आग लागली होती. त्यानंतर एमआयडीसी कडून फायर ऑडिट केले गेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. नेहमी आग लागते, चौकशी होते, दोन दिवस बातम्या सुरु असतात, त्यानंतर विषय संपतो, परंतु ठोस उपाययोजना होत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

परिसरात आगीचे लोट डोंबिवलीमध्ये एमआयडीसीमधील फेज २ मध्ये असणाऱ्या एका केमिकल कंपनीला भीषण आगीचे लोट परिसरात पसरले आहेत. तर या कंपनीजवळ ह्यूदांई कंपनीचे शोरुम आहे. या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे.

अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. तर आग परिसरातील भागात पसरत आहे, या आगीनंतर केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना धोका निर्माण झाला आहे. तर रहिवासी भागातही या घटनेची झळ पोहोचली आहे.

परिसरातील अनेक घरांच्या काचा फुटल्या आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. या भागात तापमान ४२ अंश सेल्सियस आहे. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page