
लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे असे संयुक्तरराष्ट्रांनी प्रसारीत केलेल्या आकडेवारीनुसार दिसून आले आहे. चीनची सध्याची लोकसंख्या 142 कोटी 57 लाख इतकी असून भारताची लोकसंख्या आता 142 कोटी 86 लाख इतकी झाली आहे असे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
संयुक्तराष्ट्रांकडून विविध देशांची लोकसंख्या डॅशबोर्डावर प्रदर्शित केली जाते त्यात ही आकडेवार नमूद झाली आहे. तथापि भारताची अधिकृत खानेसुमारी अजून झालेली नाही. भारतात दर दहा वर्षानी जनगणना केली जाते. या आधीची जनगणना 2011 साली झाली आहे. ती सन 2021 मध्ये होणे अपेक्षित होते.
परंतु मोदी सरकारने अजून जनगणनेचे काम हाती घेतलेले नाही. ही जनगणना जातनिहाय स्वरूपात करावी अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यामुळे वाद उद्भवला आहे. सरकारची जातनिहाय जनगणना करण्याची तयारी नाही असे सांगण्यात येत आहे.