जगातील नामांकित कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीतून तिघे दाओस परिषदेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातून मात्र मुख्यमंत्र्यांसह 47 जण सहभागी झाल्याची चर्चा आहे. याशिवाय या दौर्यावर 35 कोटींचा खर्च केल्याच्याही बातम्या आहेत.
दाओसला सह्या होतात; पण प्रत्यक्षात गुंतवणूक येते का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. ’कृषिक’च्या उद्घाटनानंतर आयोजित भाषणात त्यांनी या विषयावरून टीका केली.
कृषिकच्या उद्घाटन प्रसंगी मायक्रोसॉफ्टचे प्रमुख रणवीर चंद्रा यांनी दाओस येथून संवाद साधला. त्याचा आधार घेत खा. सुळे म्हणाल्या, मायक्रोसॉफ्टसारख्या जगविख्यात कंपनीचे लोक दाओस परिषदेत सहभागी झाले आहेत. तेथे आपल्या मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट झाली का?
हे मी त्यांना विचारेन. मी कंपनीकडे विचारणा केली तर आमच्याकडून तिघे सहभागी झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आणखी लोक नेले तर कंपनीचे दिवाळे निघेल, असे ते म्हणाले. पण, महाराष्ट्रातून तर मुख्यमंत्र्यांसह 47 जण दाओसला गेले आहेत.
शिवाय या दौर्यावर 35 कोटींचा खर्च होत असल्याचेही कळते आहे. दाओसला करारावर सह्या होतात; पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात गुंतवणूक होते का? असा सवाल खा. सुळे यांनी केला.