सुषमा अंधारे : बालगंधर्व व्यवस्थित असताना कशासाठी पाडायचं?

Photo of author

By Sandhya

सुषमा अंधारे

बालंधर्व रंगमंदिराची वास्तू सुव्यवस्थित असून, ती पाडून नव्याने उभारण्याची काय गरज आहे. तुमच्या सर्व वाटाघाटी झाल्या. परंतु, या रंगमंदिरात होणारे कार्यक्रम कुठे होणार आहेत, त्या कलाकारांची आणि बॅकस्टेज कामगारांची काय व्यवस्था केली आहे, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

बालगंधर्व येथील आर्ट गॅलरीत आयोजित बालकडू व्यंगचित्र प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी त्या माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी बालगंधर्वातील एका कार्यक्रमात बालगंधर्व पाडण्याची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच पाडले जाईल, असे वक्तव्य केले होते.

त्यावर अंधारे यांनी बालगंधर्वासाठी वेळ पडल्यास मोठं आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला. अंधारे म्हणाल्या, महा पत्रकार परिषदेनतंर नार्वेकर यांनी सर्वासारव परिषद घेतली. कागद दिला का? असे ते विचारतात.

इतके उघडे पडल्यानंतर नार्वेकर यांची कारकीर्द संपविल्यासारखे आहे. एका अर्थाने शिंदे-फडणवीस यांनी त्यांचा बळी घेतला आहे. गिरे तो भी नाक उपर, अशी परिस्थिती नार्वेकर यांची झाली.

निवडणूक आयोगाचे कागदपत्र दाखविल्यानंतर देखील तुम्ही असे बोलत असाल तर ते चुकीचे असल्याची अंधारे यांनी टीका केली. अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी नेते घडविले नाहीत. त्यांना दुसर्‍यांचे नेते चोरावे लागत आहेत. त्यासाठीच ते काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांना पक्ष प्रवेशाची ऑफर देतात, अशी टिका अंधारे यांनी केली.

Leave a Comment