चंद्रशेखर बावनकुळे : शिंदे कुटुंबांना कुठलीही ऑफर नाही…

Photo of author

By Sandhya

चंद्रशेखर बावनकुळे

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आ. प्रणिती यांना भाजप प्रवेशाची कोणतीही ऑफर दिलेली नाही. मात्र, मोदीची साथ देण्यासाठी कोणी येत असेल तर त्यांना रोखणार नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ते म्हणाले, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अत्यंत जबाबदारीने बोलत असून, शिंदे कुटुंबाला प्रवेशासाठी कोणतीही ऑफर दिली नाही. विनाकारण चुकीची माहिती पसरविण्याचे काम होत आहे.

देशासह राज्यात मोदींनी अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे. परिणामी अनेक पक्षातील नेते संपर्क साधत आहेत.

Leave a Comment