कोरेगाव भीमा विजयस्तंभाला लाखोंची मानवंदना, चोख बंदोबस्तात शांततामय कार्यक्रम पार पडला

Photo of author

By Sandhya


कोरेगांवभीमा येथील विजयस्तंभ म्हणजे शौर्याचं प्रतिक . या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला मोठ्या प्रमाणावर शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे देशभरातील लाखो अनुयायी, अनेक विचारवंत आणि नेतेमंडळी येत असतात . पण यावर्षी गर्दीचा उच्चांक घडल्याचे दिसून आले . त्याचप्रमाणे वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे ही दर्शन लाखो अनुयायांनी घेतले.याठिकाणी होणारी पुस्तकविक्रीसुद्धा देशातील सर्वात मोठी पुस्तकविक्री असेल . अनेक विचारवंत आणि नेतेमंडळींनी येथे उपस्थिती दर्शविली . मात्र विशेष म्हणजे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या भोवती तरुणांचा सदैव मोठा गराडा आणि गर्दी लक्षणीय होती . आंबेडकरी विचारांच्या अनुयायांची शिस्त, चोख पोलीस बंदोबस्त आणि प्रशासनाने आरोग्य, वाहतूक यासारख्या अनेक सुविधा पुरविल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय शांततामय आणि उत्साहात पार पडला .

Leave a Comment

You cannot copy content of this page