
राम शिंदे यांनी सपत्नीक केला कुलधर्म कुलाचार
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर दाखल होत श्रीखंडेरायाच सहकुटुंब दर्शन घेतलेय.यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत राम शिंदे यांनी भंडार खोबऱ्याची उधळण केलीये. राम शिंदे यांचा आज वाढ दिवस आहे त्यानिमत्त ते आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राम शिंदे सपत्नीक जेजुरी गडावर दाखल झाले.त्यांच्या हस्ते श्री खंडेरायाची महापूजा देखील पार पडली. यानंतर त्यांनी या ठिकाणी भंडारा खोबऱ्याची उधळण देखील केली आहे.
तर देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी देव संस्थांचे विश्वस्त पुजारी व मानकरी उपस्थित होते.