Let us resolve to make every village healthy and prosperous – Deputy Chief Minister Sunetra Pawar

Photo of author

By Sandhya

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण

बारामती, दि. १४: नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले तर देशाचे भविष्य उज्ज्वल राहील; यादृष्टीने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाला नेहमीच बळ दिले आहे, त्यामुळे प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्यावतीने बारामती तालुक्यातील होळ येथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले तसेच यावेळी जिल्ह्यातील ४४ मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दुरदृष्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, राज्याचे दिवंगत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेने साकारलेल्या विविध लोकोपयोगी आणि नाविन्यपूर्ण योजना आज संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘नासा-इस्रो भेट योजना’, ‘एकलमाता कल्याण योजनां’ सारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांची नोंद इतर राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतली आहे, त्या संस्था आज आपल्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधत आहेत, हे आपल्या कामाचे यश आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्हा परिषदेने आज एकाच वेळी, एकाच दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते ४४ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे अत्यंत साध्यापद्धतीने दूरदृष्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्याचे नियोजन केले, त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे, ही बाब स्तुत्य असून अनुकरणीय आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page