आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना खास भेट दिली आहे. पंतप्रधानांनी देशातील माता-भगिनींसाठी महत्वाची घोषणा केलीय.
पंतप्रधान मोदी यांनी आज भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले. 100 रुपयांची सवलत देण्याचा निर्णय, पीएम मोदींनी ट्विटरवर याविषयीची माहिती दिली.
याविषयी एक पोस्ट शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,”आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे आयुष्य तर सुसह्य होणार आहेच.
शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भार कमी होईल. ” असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या पुढे आपल्या पोस्टमध्ये त्यांनी आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा देताना ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा! आम्ही आमच्या महिला शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला आणि लवचिकतेला सलाम करतो.
त्यांच्या विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. “कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे. हे गेल्या दशकातील आमच्या यशातही दिसून येते.” दरम्यान, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशभरात 14.17 कोटी मोफत LPG सिलिंडर दिले आहेत.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री, रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले होते की सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत PMUY लाभार्थ्यांना तीन मोफत सिलिंडर दिले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरात 14.17 कोटी मोफत सिलिंडरचे वितरण करण्यात आले.