राज्यात विधानसभा निवडणूकीतील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर आता विरोधकांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला आहे.
‘अनेक ठिकाणी EVM मधे घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएम हॅक करता येत. मी स्वतः इंजिनिअर आहे त्यामुळं मला सगळं माहिती आहे,’ असे जानकर यांनी म्हंटले आहे. महादेव जानकर काय म्हणाले?
“अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळं मला सगळं माहित आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत.
त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचं काम झालं आहे, असं महादेव जानकर म्हणालेत. महायुतीचा अनुभव खूप वाईट आला महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यावर जानकर म्हणाले, “मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे.
त्यामुळं मी त्यांच्यापासून दूर आहे. काँग्रेसला अजून चाखल नाही. त्यामुळं त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे.” रत्नागर गुट्टे यांना इशारा
पुढे ते म्हणाले, “माझ्या पक्षाचा राज्यात सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू,” असा इशारा महादेव जानकर यांनी त्यांचेच रासपचे आमदार रत्नागर गुट्टे यांना इशारा दिला आहे.