मनोज जरांगे : निवडणुकीच्या अगोदर सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे

सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, गुन्हे वापस घ्या, षडयंत्र थांबवा व त्वरित आरक्षण जाहीर करा असे मनोज जरांगे यांनी शनिवार (ता.16 ) रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद मध्ये सांगीतले.

या वेळी बोलतांना जरांगे यांनी सांगितले की, सरकार मधील 62 आमदार, मंत्री हे भष्ट्राचारी असल्याची माहिती मिळाली आहे , फडणवीस व आमचे भांडण नाही त्यांनी माझ्या विरोधातील षडयंत्र व बदनामी थांबावी व आरक्षण द्यावे समाज त्यांना डोक्यावर घेऊन गुलाल उधळतील मात्र अंमलबजावणी केली नाही तर समाज त्यांना माफ करणार नाही,

आरक्षण न देता निवडणूका झाल्या तर फडणवीस यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल असा इशारा जरांगे यांनी दिला. निवडणुकीत र्फाम भरण्याचा निर्णय हा समाजाचा आहे मी समाजाचा मालक नाही , त्यांनी ठरवले आहे ते निर्णय घेतील मी चौकशीला घाबरत नाही,

एस.आय.टी.ची चौकशी निःपक्ष करा , ज्या पोलीस अधिकार्यांना बढती दिली त्यांच्या सह लाठीचार्ज करण्याचा आदेश देणारे गृहमंत्री, मंत्री, आमदार, पोलीस उपविभागीय अधिकारी, महसूल उपविभागीय अधिकारी, लाठीचार्ज करणारे सर्व कर्मचारी, यांची देखील चौकशी करावी असे जरांगे यांनी सांगितले.

फडणवीस यांनी मागील अधिवेशनात सांगीतले कि एस.आय.टी.चौकशीची गरज नाही माझ्या अधिकार्यांनी योग्य चौकशी केली मग आता एस.आय.टी.चौकशी कशी लावली असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला याचा अहवाल देखील तयार झाला आहे मला अडकवण्याचा यांचा डाव आहे.

शनिवार ता. 16 च्या मंत्री मंडळ कबीनेट बैठकीचा काय निर्णय होतो व आचारसंहिता लावली जाते का यावर आम्ही लक्ष ठेऊन आहे सगे सोयरे याची अंमलबजावणी बाबत निर्णय झाला नाही तर चौदा राज्यातील बांधव यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करूण नऊशे एकर मैदानात भव्य सभा घेणार आहे व लवकरच दौऱ्यावर जाणार आहे असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Leave a Comment