मनोज जरांगे पाटील : एकदा आरक्षण मिळू द्या कार्यक्रमच करतो..! 

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

राज्यात छगन भुजबळ यांच्यासारखा दुसरा कलंकित मंत्री असूच शकत नाही. मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, त्यानंतर मी त्यांचा कार्यक्रमच करतो, असा रोखठोक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

ते यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये आयोजित सभेत बोलत होते. जरांगे पुढे म्हणाले की, ”इतक्या उच्च दर्जाचा मंत्री एक पुढारी सामान्य गोर गरीब मराठयांच्या लेकरांना मिळणाऱ्या आरक्षणात आडवा येतो, हे दुर्देव आहे.

आरक्षणात आडवे जाणाऱ्यांचे टेन्शन तुम्ही घेऊ नका, त्याला मी एकटाच खंबीर आहे, असे म्हणत जरांगे यांनी समाजाला विश्वास दिला आहे.

विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या जरांगेंची गुरुवारी हिंगोलीतही सभा पार पडली. जिल्ह्यातील डिग्रस फाट्यावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीची सभा झाली होती. त्यानंतर आज जरांगे यांची सभा झाल्याने त्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  

Leave a Comment