मनोज जरांगे पाटील : मुंबईत सरकारने त्रास दिला, तर रस्त्यारस्त्यांवर मराठा दिसला पाहिजे…

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

युद्ध लढावे मराठ्यांनी आणि जिंकावे मराठ्यांनीच, अशी चेतना उपस्थित सकल मराठा समाजामध्ये चेतवत मुंबईमध्ये सरकारकडून त्रास दिल्यास महाराष्ट्राच्या रस्त्यारस्त्यांवर मराठा दिसला पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी करतानाच मराठा समाजासाठी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, या मागणीचा पुनरुच्चार केला.

निर्धारित वेळेपेक्षा तब्बल साडेसात तास उशिराने मंगळवारी पहाटे अडीचच्या दरम्यान कारेगाव-रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे जरांगे यांची सभा झाली. कडाक्याच्या थंडीतही मोठा जनसमुदाय सभेसाठी उपस्थित होता.

आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. आरक्षण आपण घेतल्यात जमा आहे. याद़ृष्टीने सकल मराठी समाजाने मुंबईकडे कूच केली आहे.

आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. प्रत्येक वेळी सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदाच मराठ्यांमध्ये एकजूट झाली आहे, यातही फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. यासाठी काही जण देव पाण्यात बुडवून बसले आहेत.

अशीच एकी पुढे राहिली, तर जगामध्ये मराठा समाज प्रगत म्हणून पुढे येईल. शिक्षण व नोकरीमध्ये आपला टक्का वाढला पाहिजे. देव आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच. 

Leave a Comment