आकाशात झेपावनारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे. हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहे. त्यामुळे है पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत जे आपल्या समोर विरोधक असतील, त्यांचा पतंग मतदासंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापल्याशिवाय राहणार नाही प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
मकरसंक्रांती निमित्त सोमवारी येवल्यात आयोजित पतंगोत्सवाला भुजबळ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. तसाच नागरिकांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, साहेबराव मढवई, दिपक लोणारी, मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, मकरंद सोनवणे आदी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, गेल्या निवडणुकीत अनेक लोक आपल्या विरोधात उभे राहिले. येवल्याच्या जनतेने मात्र, त्यांचा दोर कापला. येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे. त्यांनी विरोधात लढावे.
मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखवतील असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पदाधिकाऱ्यांना तीळगुळ वाटप यावेळी मंत्री भुजबळ यांनी येथील कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिळगुळ वाटप करत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रकार संतोष राऊळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचे चित्र रेखाटलेला पतंग भेट दिला.