खुशखबर..! स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल…

Photo of author

By Sandhya

स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

 नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कृषी, उद्योग, विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्‍ट्रात सुरू असलेले स्टार्टअप हे देशात अव्वल ठरत आहे.

नोंदणीसाठी देशात तब्बल १८ टक्के तर, यशस्वी स्टार्टअपमध्ये राज्याचे एकूण २३ टक्के योगदान असल्याने राज्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. एक लाख ५४ हजार ४४१ हून अधिक रोजगार उपलब्ध झाला आहे.

राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण-२०१८ हे सुरू असून त्यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले आहे.

आत्तापर्यंत केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाकडे राज्यातील मान्यताप्राप्त १६ हजार १४५ स्टार्टअपची नोंद झाली. देशातील यशस्वी १०८ स्टार्टअप पैकी २५ स्टार्टअप हे महाराष्‍ट्रातील आहेत.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे स्टार्टअपबाबत मोठी जनजागृती होत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये तब्बल ४१ हजार ८२१ स्टार्टअपची नोंदणी झाली.

पहिल्या रँकचा राजीव गांधी एक्सलन्स अवॉर्ड २०२१-२२, निती आयोगाकडून नॅशनल इनोव्हेशन इंडेक्सचा चौथ्या रँकचा पुरस्कारही राज्‍याला मिळाला आहे.

Leave a Comment