“मी मूर्खांना उत्तर देत नाही, हे माझे जीवनातील धोरण आहे,” ; उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

Photo of author

By Sandhya

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

“मी मूर्खांना उत्तर देत नाही, हे माझे जीवनातील धोरण आहे,” अशा शब्‍दांमध्‍ये संजय राऊत यांनी केलेल्‍या टीकेवर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

मुंबईत मंदिरात स्वच्छता मोहीमत सहभागी झाल्‍यानंतर माध्‍यमांशी ते बोलत होते. यावेळी संजय राऊत राम मंदिरावरुन भाजपवर करत असलेल्‍या टीकेवर प्रश्‍न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, मी मूर्खांना उत्तर देत नाही, हे माझे जीवनातील धोरण आहे; पण मी त्यांना हिंदूंचा अपमान करणे थांबवण्यास सांगू इच्छितो.

रामजन्मभूमीत तुमचे कोणतेही योगदान नाही. त्यांनी कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचे थांबवले पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापूर्वी देशभरातील मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे.

आम्हीही मुंबईतीलमुंबा देवी मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. सर्व लोकांनी धर्मांनी त्यांच्या श्रद्धास्थानी जावे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

काय म्‍हणाले होते संजय राऊत ? संजय राऊत यांनी भाजपाने वादग्रस्त जागेपासून चार किलोमीटर दूर मंदिर बांधल्याचा दावा माध्‍यमांशी बोलताना केला होता. मंदिर वही बनाऐंगे, असा भाजपचा नारा होता.

मात्र भाजपने मूळ मंदिराच्‍या जागेपासून चार किलोमीटर लांब मंदिर उभारले आहे. अशा प्रकारे कोणीही मंदिर उभे करु शकले असते. जिथे मंदिर उभे करायचे होते. जिथे तिथे मंदिर उभारलेलं नाही. ती वादग्रस्त जागा आजही तशीच आहे,” असा दावाही राऊत यांनी केला.

Leave a Comment