राधाकृष्ण विखे पाटील : नुसत्या यात्रा काढून पक्ष वाढत नाही…

Photo of author

By Sandhya

राधाकृष्ण विखे पाटील

चांगले काम करणार्‍यांना काँग्रेस पक्षात भवितव्य नाही. नुसत्या यात्रा काढून पक्ष वाढत नाही, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेबाबत केली.

मुंबई येथील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याबाबत मंत्री विखे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले,

माजी खासदार देवरा हे मुंबईचे अध्यक्ष असताना काँग्रेस पक्ष वाढीसाठी चांगले काम केले, परंतु चांगले काम करणार्‍यांना काँग्रेस पक्षात भवितव्य नाही.

नुसत्या यात्रा काढून पक्ष वाढत नाही. यामुळे माजी खा. मिलिंद देवरा यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असे मंत्री विखे पा. म्हणाले.

Leave a Comment