![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2024/01/Untitled-design-2024-01-23T163153.962.png)
मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार विचार करत आहे. कोणच्याही आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे.
मराठा समाजाने आंदोलनाची वाट न धरता राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२३) पत्रकारांशी बोलताना केले.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबई दिशेने निघाले आहेत.
त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव देखील आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. शिंदे म्हणाले की, राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू केले आहे.