उद्धव ठाकरे : ‘पंतप्रधानांची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी कधीच तुलना होऊ शकत नाही’

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

गोविंद देवगिरी महाराज यांनी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच भरभरुन कौतुक केलं. यावेळी ते म्हणाले,’आज अंतकरण, उल्हास, समाधान आणि कृतज्ञतेने भरलेलं आहे. ही केवळ एका मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा नाहीय. ही या देशाची अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वासच प्रतीक आहे.

आज 500 वर्षानंतर हे शक्य झालं ‘ त्यांच्या या विधानावर आता सर्वच स्थरावरून टीका होत आहे. अशात आता नाशिक येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

22 जानेवारी रोजी गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

काल कोणीतरी म्हणाले छत्रपती म्हणजे आपले पंतप्रधान..पण पंतप्रधानांची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी कधीच तुलना होऊ शकत नाही, छत्रपती होते म्हणून आज राम मंदिर उभे झाले, असे कानही त्यांनी टोचले.

तत्पूर्वी, गोविंद देवगिरी महाराज म्हणाले होते की,’महाराजांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं. आज असाच महापुरुष आपल्याला मिळालाय.

भगवती जगदंबेने हिमालयातून त्याला परत पाठवलय, जा भारतमातेची सेवा कर,. तुला भारताची सेवा करायची आहे. काही अशी स्थान असतात, जिथे आदराने आपलं मस्तक झुकतं.

मला आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींची आठवण येतेय. त्यांनी महाराजांच निश्चयाचा महामेरु अस वर्णन केलं होतं. आज आपल्याला असाच श्रीमंत योगी मिळालाय” त्यांच्या या विधानावरून सध्या राजकारण तापले आहे.

Leave a Comment