मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : “कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नावर मार्ग काढू’

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यो देशांतर्गत बाजारपेठांमधील कांद्यांचे भाव गडगडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

या प्रकणी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही उपाययोजान करून त्यात मार्ग काढू असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीचे कामकाज सुरू होण्यापुर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूर वि धानभवन आवारातील शिवसेना पक्ष कार्यालयाला भेट दिली.

त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्य सरकार नेहमीच राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.

कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही मार्ग काढू.

इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस आणि साखरेच्या पाकाचा वापर करण्यावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारचे प्रतिनिधी या विषयावर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

Leave a Comment