काँग्रेसच्या ताटाखालील मांजर होऊन सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी मिंधेपणा करणारे सर्वात मोठे मिंधे कोण? हे सर्व जनता ओळखून आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
नाशिकच्या मेळाव्यात ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचे काळीज लागते.
वाघ एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब यांच्यासारखे भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळा घातल्या म्हणजे कुणाला बाळासाहेब होता येणार नाही. बाळासाहेब होण्यासाठी बाळासाहेबांसारखे प्रखर विचार असावे लागतात, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.