मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बाप्पाला साकडे, राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा दे…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बाप्पाला साकडे

देशभरासह राज्यात आज मोठ्या थाटामाटात गणरायाचे आगमन होत आहे. सर्वत्र भक्तिभावाचे, आनंददायी वातावरण आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मंगलमय वातावरणात, भक्तिभावाने श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली.

यावेळी ‘राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा दे’ असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप्पाला घातले आहे.

गणेशोत्सवानिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री यांनी सपत्निक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. “चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ दे”, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा, आरती करुन प्रतिष्ठापना केली.

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा दे हेच मागणे आज बाप्पाकडे मागितले. तसेच नवीन संसद भवन अतिशय भव्य आणि सुंदर असून सर्वसामान्य जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा हे कायदेमंडळ नक्की पूर्ण करेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.

Leave a Comment