मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना जागा दाखवू ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात आज एक मजबूत सरकार आहे. तरीही काही लोक दिवसा स्वप्न पाहत आहेत. म्हणतात की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे पण त्या खुर्चीच्या रक्षणासाठी आमचं त्याकडे लक्ष आहे.

आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना जागा दाखवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डी येथील काकडी गावात पार पडत आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, आमचे मुख्यमंत्री चोवीस तास काम करणारे तसेच एक संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. आमच्या तिघांच्या कॉम्बिनेशनला तोड नाही. राष्ट्रीय नेते काल म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी पुन्हा येईल मात्र आले नाहीत. मी पुन्हा आलो होतो पण काही लोकांनी गद्दारी केली.

आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार आहे, मात्र आम्ही आता त्यांचा पक्षच घेऊन आलो, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे काहींच्या पोटात मळमळ होत आहे.

आमचे सरकार बंद दाराआड बसणारे नाही, असा टोलाही फडणवीसांना उद्धव ठाकरे यांना लगावला. सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी माता भगिनींसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलतीची योजना आणली.

एकही लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही, राज्यात पाऊस कमी पडला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Leave a Comment