नाना पटोले : नागपुरात १२ डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात वेळेत निर्णय घेण्याची गरज होती. शेवटी सुप्रीम कोर्टाला विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढावे लागले. महाराष्ट्राच्या विधिमंडळ व्यवस्थेला कलंक लावण्याचे यानिमित्ताने काम झाले आहे. ते पावित्र्य कायम राहावे.

आज जे चालले आहे ते बरोबर नाही. सुनील प्रभू यांचे संविधानामुळे आमदार झाल्याचा उल्लेख प्रोसेडिंगवर येऊ द्यायचा नसेल तर हे चुकीचे काम सुरू आहे. या पद्धतीने काळिमा लावण्याचे काम होत असेल, तर यावर नक्कीच  अधिवेशनात विचारणा करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज स्पष्ट केले.

दरम्यान, इंडिया आघाडीची बैठक 12 डिसेंबरला नागपुरात होत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपली की याबाबत बसून निर्णय घेऊ, यावर अजून चर्चा झालेली नसल्याचे सांगितले.

नॅशनल हेराल्ड कारवाई बाबतीत बोलताना, चिडलेल्या भाजपचा चेहरा हेरॉल्डवर कारवाईच्या माध्यमातून पुन्हा देशाला दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला लोक जमा होत नाही. सगळीकडे  पराभव निश्चित असल्याने सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. हेरॉल्ड ही देशाची प्रॉपर्टी आहे, ते गांधी परिवाराचे पैसे नाहीत.

धाड टाकून काहीच मिळणार नाही. आज न उद्या सत्य समोर येईल, घाबरण्याचे कारण नाही. वंचित आघाडीच्या इंडियात प्रवेशाबाबत प्रदेश कार्यालयाला अद्याप माहिती नाही. परस्पर माहिती दिली असेल तर त्याबद्दल माहीत नाही. त्यावर वक्तव्य करणे चुकीचे आहे. कर्नाटकमधील अमित शाह यांचे भाषण फेल ठरले आहे.

धर्माचा प्रश्न नाही. मुद्दे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याची गरज आहे. आमचे सरकार आले तर आम्ही जातीनिहाय जनगणना करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले. यात महाराष्ट्रात सुद्धा मुस्लिम ओबीसी असतील. जुमलेबाजी न करता वस्तुस्थिती पुढे येणे गरजेचे आहे. 

मराठा आंदोलन मराठा विरुद्ध ओबीसी हे संघर्ष सरकार मुद्दाम घडवत आहे. हे सरकार समाज पेटवण्याचं काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत नाही. फडणवीस म्हणतात कंत्राटी पद्धतीने भरती करणार होते, त्याच काय झालं. मुलांचे वय झाल्यावर भरती करणार का? मुस्लिममधील मागासवर्गीय जातीला सर्वेक्षण करून आरक्षण दिले पाहिजे.

काँग्रेसचे सरकार आले तर जातीनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलेच आहे. आज एका मागून एक आरक्षणाचा प्रश्न समोर येत आहे. धनगर समाजातही वातावरण तापत आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय सेन्सेस तातडीने केंद्राने करावे. भाजपमध्ये दम असेल तर जातीनिहाय जनगणना करावी असे आव्हान दिले.

अजित पवार विकासासाठी गेले आहेत. मात्र, विकास होत नसल्याने तब्बेत खराब असतानाही दिल्लीला जातात, त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. बागेश्वर सरकारचे पुण्यात प्रवचन सुरू आहे. संत तुकाराम महाराजांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला भेटायला मुख्यमंत्री जात असतील, तर हे गंभीर आहे. आस्थेला आमचा विरोध नाही. कोण कुठं जात असेल तर आम्हाला त्यावर बोलायचे नाही.

 धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, बोनसचा पत्ता नाही. करोडो रुपयांचा चुराडा शासन आपल्या दरी कार्यक्रमात केला. लाभार्थ्यांना 1900 कोटी वाटप केल्याचा दावा करतात. त्यात नवीन काय केले? कॉंग्रेसच्या काळातील योजना आहे.

त्यावेळी पंचायत समिती स्तरावर होत होती. त्यात नवीन काहीच नाही. आज गावात जायला रस्ते नाहीत. कमिशन खाण्यासाठी 70 लाखाचा पेंडॉल साडेतीन कोटींचा दाखवला जात आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात आली  असल्याचा आरोप भंडारा येथील कार्यक्रमावर केला.

Leave a Comment