नारायण राणे : मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत…

Photo of author

By Sandhya

नारायण राणे

मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेल्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

ते म्हणाले, केवळ उपोषण मागे घेण्यासाठी बोललं नाही पाहिजे. जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं, त्याबद्दल अभिनंदन. सामनातून जी २० बद्दल केलेल्या टीकेचा आज समाचार घेणार आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांनी उपोषण सोडले. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेल्या समाजातील लोकांना आरक्षण द्यावे.

शैक्षणिक पात्रता मिळवता आली नाही त्यांना, गरीब आर्थिक मागासलेल्यांना आरक्षण द्यावे. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊ नये.

सरसकट कुणबी दाखले ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. कोण मागतयं म्हणून सरसकट दाखले देऊ नयेत.कुणाचं आरक्षण काढून देऊन दुसऱ्यांना देऊ नये.

Leave a Comment