नारायण राणे : मी मराठा; कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही

Photo of author

By Sandhya

मी मराठा; कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावे, या मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तीव्र विरोध केला आहे.

सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे. कुठलाही 96 कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही. मी स्वत: मराठा आहे. मी कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असे सांगत राणे यांनी जरांगे-पाटील यांना जातीचा आणि घटनेचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे,

याबाबत पत्रकारांनी विचारले असता राणे म्हणाले, मराठा आणि कुणबी यामध्ये फरक आहे. जरांगे-पाटील म्हणतात तशा त्या एकच नाहीत.

Leave a Comment