नितीन गडकरी : नेतेच कंत्राटदार झाले, तर विकास कसा होईल…

Photo of author

By Sandhya

नितीन गडकरी

केंद्र व राज्य शासनाकडून अनेक विकास कामे मंजूर केली जातात, पण अनेक ठिकाणी नेतेच कंत्राटदार झाल्याने या कामांचा बोजवारा उडाला आहे. ही स्थिती सर्वच पक्षांत असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते. राजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे हा नसून, त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे हा असला पाहिजे.

राजकारणाचा अर्थ राष्ट्र कारण असायला हवा. देशात सुशासन असायला हवे, असे प्ररखड मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे आयोजित सभेत केले.

महायुतीतील गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि आमगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय पुराम यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ना. नितीन गडकरी म्हणाले, देशाला, राज्याला विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.

मतदारांनी सुद्धा आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो, कोण सक्षम नेतृत्व करू शकतो, या सर्व गोष्टींचा विचार करूनच मतदान करण्याची गरज आहे. योग्य नेतृत्व मिळाले, तर निश्चितच त्या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. 

देशाला योग्य नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत चालला विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असा भ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्यात आली. पण, संविधान बदलण्याची ताकद कुणातच नाही, कुणीही संविधानात बदल करू शकत नाही, हे पाप केवळ काँग्रेसनेच आणीबाणीच्या काळादरम्यान केल्याचा आरोप त्यांनी केला.

देशात भूकमरी, बेरोजगारी वाढविण्याचे काम काँग्रेसनेच केल्याची टीका गडकरी यांनी केली. २७ वर्षांच्या नेतृत्वाला जनता कंटाळली गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे २७ वर्षे नेतृत्व करणाऱ्यांनी या क्षेत्राचा कुठलाच विकास केला नाही. केवळ दुसऱ्यांनी आणलेल्या कामांना स्वतःचे लेबल लावण्याचे काम केले. त्यामुळे अशा नेतृत्वाला जनता कंटाळली होती. मतदा- रांनीच मागील निवडणुकीत त्यांना मतदारांनी घरी बसविल्याची टीका खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली.

गोंदिया ड्रायपोर्ट तयार करण्याची फाइल तयारतीन-चार वर्षांपूर्वीच गोंदिया ड्रायपोर्ट तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाची फाइल तयार होऊन पडली आहे. पण, जागा उपलब्ध न झाल्याने ड्रायपोर्ट तयार झाला नाही. त्वरित जागा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पाचे काम सुरू होईल. त्यामुळे गोंदिया येथून विविध देशांत तांदूळ निर्यात करण्यास मदत होऊन उद्योगधंद्यांना चालना मिळेल व रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सांगितले. 

Leave a Comment