ट्रक–दुचाकीच्या अपघातात एक ठार,एक गंभीर जखमीदुचाकीवर सख्खे दोन भाऊ; सुपेतील अहिल्याबाई चौकातील दुर्घटना

Photo of author

By Sandhya

बारामती तालुक्यातील सुपे–चौफुला मार्गावरील अहिल्याबाई चौकात मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. २६) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) हे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरगाव येथील शाळेतून दोन्ही सख्खे भाऊ दुचाकी (क्र. एमएच ४२ ई १८७८) वरून घराकडे जात होते. अहिल्याबाई चौकातून पुढे वळण घेत असताना त्यांची दुचाकी घसरली. त्याच वेळी मोरगावच्या दिशेने जात असलेल्या मालवाहू ट्रक (क्र. एमएच १० सीआर ४१९९) च्या चाकाखाली दुचाकी गेल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात सोमनाथ ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम ठोंबरे गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस घटनास्थळी दाखल होवुन झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. अपघाताचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page