पालकमंत्री विखे पाटील : भारतरत्न आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीबाबत पुढाकार घेणार

Photo of author

By Sandhya

पालकमंत्री विखे पाटील

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीबाबत निश्चितपणे पुढाकार घेऊ, अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

महापरिनिर्वाण दिनानिमित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जावेद जहागिरदार,

अमोल खताळ शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ कानकाटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आबासाहेब थोरात, युवकचे अध्यक्ष कपिल पवार, राहूल भोईल, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसिलदार धीरज मांढरे, मुख्याधिकारी वाघ, गटविकास अधिकारी‌ नागणे, उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिवादन कार्यक्रमानंतर मंत्री विखे पाटील यांची प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याप्रमाणेच भाररत्न आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारून त्यांच्या विचारांची प्रेरणा सतत मिळत राहण्यासाठी केलेल्या निर्णयाप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्मारक पुतळ्याच्या रुपाने उभारण्यासाठी योगदान दिल्याचे मलाही समाधान वाटेल, असेही विखे पाटील म्हणाले.

यासंदर्भात सकारात्मक निर्णय करण्याची तयारी असल्याची ग्वाही देवून अधिकाऱ्यांनी जागेची पाहाणी करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

Leave a Comment