डोंबिवली वरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकर्यांच्या बसचा भीषण अपघात एक्सप्रेसवे वर झाला आहे. आषाडी एकादिशी साठी वारकरी पंढरपूरला निघाले होते. डोंबिवली वरून ४ ट्रॅव्हल्स रात्री निघाल्या होत्या.
रात्री १ च्या दरम्यान एक्सप्रेस वे वर ट्रॅव्हल्स पोचली असता समोर चालणाऱ्या ट्रक्टरला मागून बस धडकली. यात बसचा ताबा सुटल्याने हायवे सोडून बस ३० ते ४० फुट खोल खड्यात जावून पडली.
यावेळी बसमध्ये ५४ वारकरी होते. यातील ५ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहेत. तर ३० जण किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींवर एमजीएम रूग्णालय, पनवेल ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान एक्सप्रेसवे वर ट्रॅक्टर ला बंदी असतानाही ट्रॅक्टर आल्याने पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.