पंतप्रधान नरेंद्र मोदी : 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा; घरोघरी ‘रामज्योती’ पेटावी…

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राम मंदिराच्या उद्घाटनदिनी २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करावी. तसेच घरोघरी रामज्योती पेटावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे.

अयोध्येत आज मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. यावेळी आयोजित सभेत मोदी बोलत होते.

२२ जानेवारीला सर्वांनी अयोध्येला येऊ नये – मोदी सर्व देशवासियांना माझी आणखी एक प्रार्थना आहे की, प्रत्येकाची इच्छा आहे की २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी अयोध्येला जावं.

पण ते तुम्ही देखील जाणता की सर्वांना इथं येणं शक्य नाही. अयोध्येत सर्वांचं येणं खूपच अवघड आहे. त्यासाठी देशभरातील रामभक्तांना माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी २२ जानेवारी रोजी एकदा विधीपूर्वक कार्यक्रम झाल्यानंतर २३ जानेवारीनंतर आपल्या सोयीनुसार अयोध्येला यावं.

अयोध्येला २२ जानेवारीला जायचंच असं करु नका. प्रभू रामाला त्रास होईल असं आपण भक्त कधी करणार नाहीत. साडे पाचशे वर्षे आपण वाट पाहिली काही दिवस अजून वाट पाहुयात, असं आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

Leave a Comment