विरोधकांची भूमिका निंदनीय असून ‘मविआ’चे सरकार आल्यास जनहिताच्या योजना बंद होतील, अशी भीती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
‘मविआ’चे सरकार आल्यास जनहिताच्या योजना बंद विरोधक जातीपातीचे राजकारण करताहेत महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवे
बावनकुळे पुढे म्हणाले की, आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केलेले नाही.
मुळात मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक होती. परंतु, विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही.
विरोधक जातीपातीचे राजकारण करताहेत हे जनतेला दिसले. उद्या चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील. महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवे आहे, असा दावा बावनकुळे यांनी यावेळी केला.