काँग्रेसच्या काहींचा भाजपच्या काहीशी छुपा सबंध आहे .नाना पाटोले नेमके कुणाचे काँग्रेसचे की गडकरींचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.नाना पटोले यांची अशोक चव्हाण यांच्यासोबतही मॅच फिक्सिंग तर नाही अशी शंका नांदेड जागेवरून निर्माण होत आहे.
एकंदरीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपची छुपा समझोताअसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अँड . प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात केला. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की , राज्यात काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याचं पत्र पाठवण्यात आलं होतं, मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला केवळ दोन जांगावर पाठिंबा हवा आहे.
यातून भाजपच्या काही नेत्यांसोबत त्यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसने पटोलेंना भंडारा गोंदियातून उमेदवारी जाहीर केली, पण त्यांनी का माघार घेतली. हे आता समोर येत आहे. त्यांना भाजपसोबत लढायचे नव्हते . दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार जिंकणार यापेक्षा नितीन गडकरी हरतील याच दुःख त्यांना होतं आहे.
दरम्यान काँग्रेस अध्यक्षांवर किती विश्वास आहे, हे यातून स्पष्ट झालं. नाना पटोले आणि भाजपच्या नेत्यांशी असलेलं नातं उघड होत आहे. वंचितने महाविकास आघाडीमध्ये समावेश केला असता, तर भाजपच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला असता. तेच नाना पटोलेंना नको होतं. त्यामुळे वंचितला बाहेर ठेवण्यात आले असा आरोपी अँड .आंबेडकर यांनी नाना पटोलेंवर केला आहे.
काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा भाजपच्या नेत्यांशी छुपा संबंध आहे, त्यामुळ काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे गंभीर्याने पाहावं असा आवाहनही आंबेडकरांनी केलं. मविआसोबत बोलणी थांबली आहे.
काँग्रेसला दिलेल्या पत्रानुसार अधिक मतदारसंघासाठी पाठिंबा मागणी आली तर कदाचित देऊ. दिलेला शब्द पाळला जाणार. भाजपचा पराभव करणं हेच आमचे लक्ष असल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले.