प्रकाश आंबेडकर : …तर ओबीसी आरक्षणाला धोका…

Photo of author

By Sandhya

प्रकाश आंबेडकर

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर निवडणुकीनंतर ओबीसींच्या आरक्षणाला धाेका निर्माण होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

अकोला येथे धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी १९९० मध्ये आरक्षणाची शिडी तयार केली. यामुळे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होत आहेत. 

Leave a Comment