
सरकार मनोज जरांगेंना आरक्षण प्रश्नावर झुलवत ठेवत आहे. जरांगेंचा लढा हा सर्वसामान्य मराठा समाजासाठी सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जरांगे यांनी निजामी वृत्तीच्या मराठा नेत्यांपासून सावध राहावे.
ते फसवतील, घात करतील, असा सावधगिरीचा सल्ला माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. ते म्हणाले की, गरीब मराठ्यांना जरांगे नक्कीच न्याय मिळवून देतील. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे.
सध्या ओबीसी व मराठा समाज एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. या दोन्ही समाजांत मध्यस्थी करण्यास मी तयार आहे.
सामान्य लोकांत जेवण घ्या, जरांगेंना सल्ला देताना अॅड. आंबेडकर म्हणाले की, ते सध्या आंदोलनात चालत असताना ज्या मोजक्या लोकांत जेवण घेतात त्याऐवजी त्यांनी सर्वसामान्य लोकांत जेवण घ्यावे.