भाजपला केंद्रातून घालवणे ही सर्वांची प्राथमिकता असावी. काँग्रेसला भाजपला हटवायच आहे की, आपला पक्ष वाढवायचा आहे, याचा निर्णय घ्यावा लागेल.
आघाडीसोबत लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण युती झाली नाही तर आम्ही आमचा धोरणात्मक निर्णय घेऊ, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आज (दि.१२) माध्यमांशी ते बोलत होते. देशात काँग्रेसने मित्रपक्षांसोबत केलेली युती टीकेल का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
संजय राऊत माध्यमांशी खोट बोलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमच्यात समझोता झाला आहे आणि आमच्यात सगळ अलबेल आहे, हे राऊत खोट बोलतात. ते खोटं बोलत नसतील तर, त्यांनी त्यांच्यातील १० जागांचा वाद संपला आहे का? संपला असेल तर त्या १० जागा कोणत्या पक्षाला दिल्या, त्याचा खुलासा करावा.
तसेच ५ जागा ज्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील आहेत, त्याच वाटप कसं झालंय याचा खुलासा त्यांनी करावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आम्ही महाविकास आघाडी सोबत बसतोय, संजय राऊत यांच्यासोबत नाही, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत बोलताना त्यांनी काँग्रेस जनाधार वाढवण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा काढत असल्याचे म्हटले आहे.
मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महाविकासआघाडीकडून वेळकाढूपणा सुरू आहे. पण मविआची जागावाटपाची चर्चा लवकरच संपेल, असे सांगताना त्यांनी नवनीत राणा या सर्वात मोठ्या फ्रॉड असल्याची टीका केली आहे.