मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी भाळवणी येथे बोलताना दिली.
तालुक्यातील दुष्काळ पाहणीच्या निमित्ताने त्यांनी दक्षिण भागातील येड्राव, खवे, जित्ती , निंबोणी, भाळवणी,हिवरगाव,खुपसंगी,जुनोनी,गोणेवाडी,लक्ष्मीदहिवडी,आंधळगाव,गणेशवाडी,शेलेवाडी,अकोला,कचरेवाडी, येथील ग्रामस्थांची संवाद साधला.
या दौऱ्यात त्यांच्या समवेत धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, सुरेश कोळेकर,तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर,पांडुरंग जावळे,पांडुरंग माळी, शहराध्यक्ष मनोज माळी, युवक तालुकाध्यक्ष अॅड रविकरण कोळेकर, पांडुरंग निराळे,शिवशंकर कवचाळे,
मारुती वाकडे ,अजय अदाटे, बापू अवघडे, नाथा ऐवळे, सुनीता अवघडे , महादेव शिंदे पंडित माने, नामदेव चौगुले,सिताराम भगरे, काशिनाथ सावंजी,धनाजी चव्हाण,विष्णू भंडगे उपस्थित होते.यावेळी बोलताना आ.शिंदे म्हणाल्या की,
एखादा प्रश्न उपस्थित करणे व त्यासाठीचा पाठपुरावा सोडून देणे, त्यासाठी शो करणे एवढ्या पुरते गप्प न बसता तो प्रश्न चिकाटीने सोडवला पाहिजे या भूमिकेतून मी काम करत आहे मला राजकारणापेक्षा समाजकारणात व लोकांची कामे करण्यात अधिक रस आहे.
त्यावर मी समाधानी आहे सध्याचे सरकार ठेकेदाराच्या जीवावर काम करते त्यामुळे त्यांना लोकांच्या प्रश्नांची काही देणे घेणे राहिले नाही. माझ्याकडे कोणताही कारखाने अथवा संस्था नाही त्यामुळे ईडी वगैरे माझ्याकडे येण्याचा प्रश्न नाही.
मी सत्ताधारी व पंतप्रधानाच्या विरोधात प्रकटपणे बोलते. धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे म्हणाले की,केंद्रात सरकार कुणाचे येऊ द्या मात्र या मतदारसंघातील प्रश्न भांडणारा लोकप्रतिनिधी निवडून जाणे आवश्यक आहे या मतदारसंघातील प्रश्नांची जाण ठेवून लोकसभेत आवाज उठवणारा लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे.
आ.प्रणिती शिंदे या संघर्ष करणाऱ्या नेत्या असल्यामुळे शहर मध्ये त्या सलग तीन वेळा निवडून आल्या. एका चुकीची शिक्षा दहा वर्षे भोगत आहे.
सरपंच लक्ष्मण गायकवाड म्हणाले की सध्या कडब्याला जिल्हाबंदी असल्यामुळे शिवारात चारा पडून आहे तोच चारा शासनाने खरेदी करून दुष्काळी भागातील जनावराला द्यावा अशी देण्याबाबत मागणी केली यावेळी काशिनाथ सावजी, महादेव शिंदे, महादेव साखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.