PUNE : 11 गणेश मंडळ एकत्रित येऊन सर्वांत मोठी मिरवणूक काढणार; बाप्पाचे एकत्रित स्वागत

Photo of author

By Sandhya

11 गणेश मंडळ एकत्रित येऊन सर्वांत मोठी मिरवणूक काढणार

सर्व धर्म समभाव, प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकतेचे बीज पेरणे व यंदा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा 350 व्या राज्यभिषेक साजरा करण्यात येत आहे.

याचाच आधार घेऊन धनकवडी येथील 11 गणेश मंडळांनी एकत्रित येऊन सार्वजनिक मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल मोहन नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पोळ व विश्वस्त अनिरुद्ध येवले यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाइ स्टार मित्र मंडळ, केशब मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ एका मित्रमंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहननगर मित्र मंडळ या सारखे 11 गणेश मंडळ एकत्रित येऊन सर्वांत मोठी मिरवणूक काढणार आहेत.

मंगळवार, दि. 19 सप्टेंबर रोजी 1 ते 5 दरम्यान काढण्यात येणार्‍या मिरवणुकीत 8 ते 10 हजार नागरिक सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून निघेल. धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, शिवशंकर चौक ते मोहनगरपर्यंत येणार आहे.

यामध्ये ज्ञानप्रबोधिनी वाद्य आणि गोविंद बँड पथक असणार आहे. सर्व मंडळांच्या सहयोगाने 24 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिरात मधुमेह व किडनी तपासणी मोफत केली जाणार आहे. त्याचबरोबर विसर्जन मिरवणूकही एकत्र काढण्याचा विचार सुरू असल्याचे येवले यांनी सांगितले.

Leave a Comment