PUNE BIG NEWS : शहरात १४४ कलम लागू…

Photo of author

By Sandhya

शहरात १४४ कलम लागू

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पुणे शहरात कायदे, नियम तसेच न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आला आहे. ३१ मार्चपर्यंत शहरात कलम १४४ लागू राहणार आहे.

पुणे पोलीस प्रशासनाकडून अलर्ट मोडवर आले आहे. शहरात १४४ कलम लागू केल्यानंतर आता शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक व चालक यांची बैठक झाली आहे.

पुणे पोलीस प्रशासनाकडून शहरातील कायदे, न्यायालयीन आदेशांची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून सीआरपीसी कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत शहरात कलम १४४ लागू असणार आहे.

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन बार, पब्स रात्री दीड वाजल्यानंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानुसार पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट मालक आणि चालकांना कलम १४४ अंतर्गत आदेश दिले आहेत.

हुक्का पार्लर बंद – पुणे शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत आहेत. पोलिसांकडून पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Comment