पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन चालकाचे वडील आणि आजोबावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोघांसह ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. वृत्तात म्हटले आहे की, स्थानिक व्यावसायिकाच्या मुलाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.