PUne CRIME : मारहाण करत दुकानदाराला लुटले

Photo of author

By Sandhya

मारहाण करत दुकानदाराला लुटले

तोंडात चापट मारून सिगारेट मागितल्याचा जाब विचारला म्हणून तिघांनी दुकानदार तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गल्ल्यातील दोन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटली.

या वेळी आत्याचा मुलगा आणि आत्या वाद सोडविण्यासाठी आले असताना, त्यांनादेखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी, ऋतीक दत्तात्रय चव्हाण (वय 21), शुभम रामकिसन हराळकर (वय 22) या दोघांना अटक केली.

तर, त्यांच्या अन्य एका साथीदारासह तिघांविरुद्ध अलंकार पोलिसांनी मारहाण, जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. याबाबत प्रथमेश बिरादार (वय 19, रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड) याने फिर्याद दिली.

ही घटना सोमवारी (दि.7) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कर्वे रोड कोथरूड येथील लकी स्टोअर्स या दुकानात घडली.

फिर्यादी तरुण हा दुकानात थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या तोंडात चापट मारून सिगारेट मागितली. तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गल्ल्यातील दोन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.

जाहिरातीच्या टीव्हीचे नुकसान केले. वाद सोडविण्यासाठी फिर्यादींच्या आत्याचा मुलगा आणि आत्या आली होती. त्यांनादेखील आरोपींनी मारहाण केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सपताळे करीत आहेत.

Leave a Comment