PUNE NEWS : कात्रज चौकातील उड्डाणपुलाची लांबी वाढणार

Photo of author

By Sandhya

कात्रज चौकातील उड्डाणपुलाची लांबी वाढणार

वंडरसिटी ते राजस सोसायटी यादरम्यान कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाची लांबी नऊशे मीटर वाढवण्याचा विचार महापालिका प्रशासन करत असून, यासंदर्भात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाबरोबर चर्चाही झाल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

कात्रज कोंढवा रस्ता 84 ऐवजी आता 50 मीटर रुंद केला जाणार आहे. यामुळे भूसंपादनाचा खर्च 280 कोटी रुपये इतका येणार होता. यांपैकी 200 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार या निधीबाबत राज्य सरकारकडून पालिकेला पत्र आले आहे.

मात्र, अद्याप निधी मिळालेला नाही. दरम्यान, उड्डाणपुलाची लांबी नऊशे मीटरने वाढवून तो उड्डाणपूल खंडोबा मंदिर येथील अंडरपासच्या अलीकडे उतरविण्यात येईल.

या उड्डाणपुलाचा वापर करून खाली रस्त्यावर आलेल्या वाहनांना अंडरपासचा वापर करून पुढे जाता येईल. हा उड्डाणपूल बांधला, तर महापालिकेचे सुमारे अठरा कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. 

Leave a Comment