PUNE : PMPML बस चालकाचा काल मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून

Photo of author

By Sandhya

PMPML बस चालकाचा काल मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून

पुण्यातील जांभूळवाडी भागात मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बस चालकाचा काल मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला आहे.

राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६ वर्ष, रा. जांभूळवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून

सोमनाथ अशोक कुंभार (वय 30 वर्ष, रां. जांभूळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय 20 वर्ष, रा. धनकवडी) यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , जांभूळवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पीएमपीएमएलचे ड्रायव्हर दिवेकर आणि त्याचे मित्र हे एकत्र दारू पीत बसले होते. यावेळी त्यांच्या मध्ये वादावादी झाली. याच कारणावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

Leave a Comment