PUNE : सिंहगड किल्ल्यावर ऑनलाइन टोल वसूल करण्याचा निर्णय

Photo of author

By Sandhya

सिंहगड किल्ल्यावर

सिंहगड किल्ल्यावर वाहनाने जाणार्‍या पर्यटकांना उपद्रव शुल्काचे (टोल) पन्नास, शंभर रुपये रोख देताना गैरसोय होत असल्याने वन विभागाने आता ऑनलाइन टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत पर्यटकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, रविवारी सुटीच्या दिवशी सिंहगडासह राजगड, तोरणा गडावरील पर्यटकांची संख्या रोडवल्याचे चित्र दिसून आले. श्रावण महिना सुरू झाल्याने पर्यटक धार्मिक स्थळांना भेटी देण्यास पसंती देतात.

त्यामुळे सिंहगडासह इतर किल्ल्यांवर नेहमीपेक्षा पर्यटकांची संख्या सध्या कमी झाली आहे. गेल्या रविवारच्या तुलनेत आज (दि.20) जवळपास चाळीस टक्के पर्यटकांची संख्या कमी होती.

दिवसभरात गडावर 926 दुचाकी, 400 चारचाकी वाहने आल्याची नोंद झाली. खडकवासला धरण चौपाटी, तसेच पानशेत धरण परिसरात पर्यटकांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती.

ऑनलाईन टोल वसुलीबाबत पुणे (भांबुर्डा) वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले, ’उपद्रव शुल्क सुरू झाल्यापासून रोख पैसे घेतले जात आहेत.

पर्यटक, तसेच स्थानिक नागरिकांनी मागणी केल्याने ऑनलाइन शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित बँकेला पत्र दिले आहे. आगामी दोन दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करून ऑनलाईन टोल वसुली सुरू करण्यात येणार आहे. यापुढे रोखीने टोल वसुली करण्यात येणार नाही.

Leave a Comment